नंदुरबार जिल्हा

अक्‍कलकुवा पोलिस जोमात, अवैध ताडी विक्रेते कोमात; तालुक्‍यात चार ठिकाणी धाडी टाकत केली २२५ लिटर ताडी नष्‍ट

अक्‍कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अक्‍कलकुवा तालुक्‍यात अवैध ताडी विक्री करून सामान्‍यांच्‍या जीवाशी खेळणार्‍या ताडी विक्रेत्‍यांविरोधात अक्‍कलकुवा पोलिसांनी कारवाईची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. याच अंतर्गत पोलिसांनी तालुक्‍यातील चार वेगवेगळ्‍या ठिकाणी धाडी टाकून तब्‍बल २२५ लिटर अवैध ताडी जप्‍त करून नष्‍ट करण्‍यात आली.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तालुक्‍यात काही जण अवैधरित्‍या ताडीची विक्री करीत असल्‍याची माहिती मिळाली होती. त्‍यानुसार सर्वांत आधी अक्‍कलकुवा बसस्‍थानक परिसरात धाड टाकण्‍यात आली. या ठिकाणी तब्‍बल ६० लिटर ताडी जप्‍त करून तत्‍काळ नष्‍ट करण्‍यात आली. या प्रकरणी करुणाकर सेदुलू राचाकोंडा (रा. कैथेपल्‍ली मंडप, गुडीवाडा, नलगोंडा, आंध्रप्रदेश) याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. यानंतर तालुक्‍यातील कोराई येथील दहेली नदीच्‍या काठावर छापा मारण्‍यात आला. तेथे ४० लिटर ताडी जप्‍त करून नष्‍ट करण्‍यात आली. या ठिकाणी कोराई येथील सुरेश तडवी याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
या पाठोपाठ वाण्‍याविहिर फाट्यावर देखील पोलिस पथकाने धाड टाकून ५५ लिटर ताडी जप्‍त करून तिची विल्‍हेवाट लावली. या ठिकाणी वेकन्ना तिरास्‍वामी कोंडा ((रा. कैथेपल्‍ली मंडप, गुडीवाडा, नलगोंडा, आंध्रप्रदेश) याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. यानंतर सोरापाडा येथही अशीच कारवाई करताना पोलिसांनी ७० लिटर ताडी जप्‍त करून नष्‍ट केली. या प्रकरणी येथे गौडी चेरला लिंगय्‍या याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button