गुन्हे वार्ता

अंकलेश्वर- बऱ्हाणपूर रस्त्यावर भीषण अपघात; भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; डेडवा फाट्यावरील घटना

अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अंकलेश्वर- बऱ्हाणपूर रस्त्यावर डेडवा फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संबंधित पिकअप व्हॅन चालकाच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर- बऱ्हाणपूर रस्त्यावर डेडवा फाट्यावर पिकअप व्हॅन (एमएच ३९ एडी १६७८) चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला (जीजे २६ एए ६७५४) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यामुळे दुचाकीस्वार दीपकभाई जितेंद्रभाई पाडवी (३०, रा. राणीपुर, ता. सागबारा, गुजरात) रस्त्यावर फेकला गेला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या. यातच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जितेंद्रभाई जससिंगभाई पाडवी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पिकअप व्हॅन चालक रोहित रमेश ठाकरे (रा. जावदा, ता. शहादा, जि. नंदुरबार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र सोनवणे करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button