गुन्हे वार्ता

शहादा शहरात मशिदीत जोरदार राडा : पाय पसरून बसल्‍याच्‍या रागातून एकाला जबर मारहाण, पाच जणांविरोधात गुन्‍हा

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील कुकडेल सुन्नी जमा मशिदीत पवित्र रमजान महिन्‍यातच सायंकाळच्‍या नमाजच्‍या वेळेत जोरदार राडा झाला. मशिदीत पाय पसरून बसल्‍याच्‍या रागातून पाच जणांच्‍या टोळीने एकाला जबर मारहाण करतानाच जीवे मारून टाकण्‍याची धमकी दिल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला. या प्रकरणी मारहाण करणार्‍या सर्वांवर सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून गोंधळ घालीत एकाला मारहाण केल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्‍या सुमारास शहादा शहरातील कुकडेल सुन्नी जामा मशिदीत मुस्‍लिम बांधव सायंकाळच्‍या नमाजसाठी एकत्र आले होते. त्‍याचवेळी मशिदीच्‍या आत शफीक महेमूद अन्‍सारी (४२, धंदा – रेडिमेड कापड दुकान, रा. कुकडेल आझाद चौक, उतरती जवळ, शहादा, जि. नंदुरबार) हे मशिदीत पाय पसरून बसले होते. याचा राग आल्‍याने इरफान अफान अन्‍सारी याने त्‍यांना याचा जाब विचारतानाच शिविगाळ सुरू केली. तसेच इतरांना त्‍याला मारहाण करण्‍यासाठी उचकावले.
यानंतर सगळे जण शफीक याला मशिदीबाहेर घेऊन गेले. तेथे इरफानसह अन्‍य पाच जणांनी त्‍याला लाथाबुक्‍क्‍यांनी, काठीने पायावर, पाठीवर, कमरेवर जोरदार मारहाण केली. यात शफीक अन्‍सारी जखमी झाले असून, त्‍यांनी रात्री उशीरा या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्‍यात फिर्याद नोंदवली. त्‍यानुसार, इरफान अफान अन्‍सारी, अज्‍जू इक्‍बाल अन्‍सारी, अख्‍तर इक्‍बाल अन्‍सारी, मोहसिन अफान अन्‍सारी, आवेश इक्‍बाल अन्‍सारी (सर्व रा. कुकडेल आझाद चौक, उतरती जवळ, शहादा, जि. नंदुरबार) या पाच जणांविरोधात भारतीय न्‍याय संहितेच्‍या विविध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button