ब्रेकिंग न्यूज : शिक्षणमंत्री अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा; जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

नवी दिल्ली (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसंस्था) : गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर शनिवारी मोठे यश आले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शनिवारी दुपारी प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला.
पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी काल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा देत सरकारला या मुद्यावर निर्णयासाठी शनिवारी दुपारपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. सोबतच प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याची इशाराही दिला होता. दिल्लीतील या आंदोलनाचे लोण मुंबईसह राजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमध्ये पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट
दरम्यान, धर्मेंद प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून, त्यात राजीनाममा पंतप्रधानांकडे पाठवल्याचे म्हटले आहे. जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे, असे प्रधान यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.



