नंदुरबार जिल्हा

तळोदा तालुक्यात भीषण अपघात; अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले; २ तरुणांचा जागीच मृत्यू

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळोदा तालुक्यातील दसवड फाट्यानजीक घडली. या अपघातात ठार झालेल्या तरुणांचे वय अवघे २४ व २६ आहे. विशेष म्हणजे अपघात घडल्यानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल कर्मा वसावे (२६, रा. मोकस, ता. अक्कलकुवा) आणि मिथुन उदेसिंग पाडवी (२४, रा. जमाना, ता. अक्कलकुवा) हे दोघे तरुण मोटारसायकल (क्र. एमएच ३९ एएन ८३०२) वरून अक्कलकुवा येथून तळोदाकडे निघाले होते. दसवड फाट्यानजीक पोहोचल्यावर अचानक आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. अपघातानंतर`रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत धडक देणारे वाहन तेथे न थांबता तेथून निघून गेले. लवकर मदत न मिळाल्याने दोन्ही तरुणांनी जागीच दम तोडला.
काही वेळाने तेथून जाणाऱ्या लोकांनी अपघात पाहून तातडीने तळोदा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह रुग्णालयात हलवले. नंतर वनसिंग कर्मा वसावे यांनी याबाबत फिर्याद नोंदवल्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक अकिलखान पठाण या प्रकरणाचा तपस करीत असून, अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button