गुन्हे वार्ता

नंदुरबार हादरले : १७ वर्षांची मुलगी आई झाली, पुढे बाहेर आलेले सत्य धक्कादायक; नेमके काय झाले वाचा…

शहादा / नंदुरबार ((नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हसावद येथे येथे अवघ्या १७ वर्षांच्या युवतीने बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी आणि चौकशीअंती समोर आलेल्या सत्याने शहादा तालुकाच नव्हे तर अवघा नंदुरबार जिल्हा हादरून गेला. नऊ महिन्यांपूर्वी या मुलीवर तिच्या सख्ख्या भावानेच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक माहिती तिच्या चौकशीतून समोर आली असून, आता पोलिसांनी तिच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिचा भाऊ मात्र फरार झाला आहे.
सदरील मुलगी गर्भवती होती. प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिला म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अल्पवयीन असूनही प्रसूती झाल्याने रुग्णालय प्रशासनाला शंका आली. त्यात चौकशीअंती धक्कादायक माहिती समोर आल्याने रुग्णालय प्रशासनाने तातडीने म्हसावद पोलिसांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन मुलीचा जबाब नोंदवून घेतला.
या जबाबानुसार ९ महिन्यांपूर्वी म्हणजे २०२५च्या जून महिन्यात घरातील सर्व जण शेतात काम करण्यासाठी गेलेले असताना सदरील मुलगी आणि तिचा भाऊ असे दोघेच घरी होते. घरी इतर कुणीच नसल्याचा गैरफायदा घेत भावाने या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर नंतरही अनेकदा अशाच परिस्थितीचा गैरफायदा घेत तो तिच्यावर अत्याचार करीत राहिला. यातून ती गर्भवती राहिली. हा सर्व घटनाक्रम उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांसह सारेच हादरून गेले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, नातेसंबंधांना काळिमा फासणारी ही घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुलीच्या जबाबानात`जबाबानंतर म्हसावद पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार मुलीच्या संशयित आरोपी असलेल्या सख्ख्या भावाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४ (२) (एफ) (एम), ३५१ (२) (३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत कलम ४, ५ (जे) (२), ५ (एल), ५ (एन), ६, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे, गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी म्हसावद पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली असून, त्याच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आता पीडित अल्पवयीन मुलीला वैद्यकीय व समुपदेशनाची मदत देण्याबाबत प्रशासनाकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button