चंदेरी

रश्मिका अन् विजयच्या लग्नाची तारीख फायनल? पत्रिका व्हायरल झाल्याने चर्चाना पुन्हा उधाण!

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : होणार, होणार म्हणून ज्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती, तो मुहूर्त येऊन ठेपल्याचे आता बोलले जात आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचं लग्न. हो, हे दोघे फायनली विवाह बंधनात अडकत असून, तशी पत्रिकाच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पत्रिकेतील नोंदीनुसार हे दोघे येत्या २६ फेब्रुवारीला परस्परांच्या गळ्यात वरमाला घालणार आहेत.
या दोघांनी अगदी गुपचूप साखरपुडाही उरकल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या दोघांनी 2 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न उरकल्याचेही बोलले जात होते. मात्र, ती अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. पण आता विजय आणि रश्मिका यांच्या लग्नाचे ‘वेडिंग कार्ड’ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने त्यांच्या चाहत्यांच्या उत्साहाला पुन्हा उधाण आले आहे. या व्हायरल कार्डमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील. विजय आणि रश्मिका यांच्या लग्नाला कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. तर, 4 मार्च रोजी हैदराबादमधील एका भव्य हॉटेलमध्ये रिसेप्शन होणार आहे, असेही सांगण्यात येणार आहे. अर्थात, यो दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांसह आप्त स्वकीयांकडून या विषयावर आतापर्यंत तरी कुणीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची चर्चा खरी आहे की आधीप्रमाणेच ही देखील अफवाच निघणार, हे २६ फेब्रुवारीलाच स्पष्ट होऊ शकणार आहे.
काय म्हटले आहे पत्रिकेत?
“मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी आणि आमच्या आयुष्यातील अत्यंत खास क्षणाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी हे पत्र लिहित आहे. आमच्या कुटुंबियांच्या प्रेम आणि आशीर्वादाने रश्मिका आणि मी 26.02.2026 रोजी एका छोट्या आणि खासगी समारंभात विवाहबंधनात अडकत आहोत”
“आमच्या आयुष्यातील या नव्या अध्यायाची सुरुवात करताना, सुंदर आठवणी निर्माण करताना, आमच्या प्रवासाचा भाग राहिलेल्या सर्वांसोबत हा आनंद वाटण्याची आमची मनापासून इच्छा आहे. तुमची उपस्थिती आणि आशीर्वाद आमच्यासाठी हा क्षण अधिक खास आणि अविस्मरणीय ठरवतील”, असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पत्रिकेवर दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या या पत्रिकेच्या सुरुवातीला विजय देवरकोंडा असे लिहिले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button