नंदुरबार जिल्हा

शिंदे गटाच्या शिवशक्ती वाहतूक सेनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी विजयसिंग गिरासे; दादाभाई मिस्तरी यांच्यावर खान्देश उपाध्यक्षपदाची जबाबदारी

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रेरित शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी विजयसिंग गिरासे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या कार्यकारणीत खान्देश उपाध्यक्षसह जिल्ह्यातील 9 जणांना स्थान देण्यात आले असून, शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अली भाई, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशपाक शहा यांच्या आदेशानुसार शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेनेची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारणीत खान्देश उपाध्यक्षपदी दादाभाई मिस्तरी यांची तर जिल्हाध्यक्षपदी विजयसिंग गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेची ध्येयधोरणे, वाहतूकदारांच्या हिताचे कार्यक्रम वेळोवेळी निष्ठेने राबवावीत. वाहतूकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांची विश्वासार्हता जपणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे : जिल्हा सचिव सुनील बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ सुतार, जिल्हा संपर्कप्रमुख देविदास माळी, तालुकाध्यक्ष प्रवीण बच्छाव, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गिरासे, शहराध्यक्ष नयन चौधरी, शहर उपाध्यक्ष दिनेश बोरसे, संपर्कप्रमुख दिलीप मेने.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button