नंदुरबार जिल्हा

नवापूरच्या पांगराण गावाजवळ भीषण अपघात; अज्ञात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; एका तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील पांगराण गावाजवळ शनिवारी भीषण अपघात झाला. भरधाव वेगात धावणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी अज्ञात वाहनाच्या चालकाच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन तरुण दुचाकीवरून जात असताना पांगराण गावाच्या पुढे काही अंतरावर भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला (एमएच ३९ एएच ०८७८) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की धडक बसताच दुचाकीवरील तरुण रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये प्रवीण सुरेश वळवी याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यामुळे तो जागीच गतप्राण झाला. तर अंकेष बारक्या नाईक आणि राजू लग्न्या नाईक (सर्व रा. वाटवी, ता. नवापूर, जि. नंदुरबार) हे अन्य दोघे तरुण गंभीर जखमी झाले. दोन गाड्यांच्या धडकेमुळे झालेल्या आवाजाने तेथे मदतीला आलेल्या लोकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यानच्या काळात अपघात होताच धडक देणाऱ्या वाहनाचा चालक मदत न करता वाहन घेऊन तेथून पळून गेला.
नंतर सारिका प्रवीण वळवी यांच्या फिर्यादीवरून संबंधित अज्ञात वाहन चालकाविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक केशव गावित हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button