नंदुरबार जिल्हा

माजीमंत्री आ. डॉ.विजयकुमार गावित यांना मुंबईला हलवले; शिंदेंनी भेट घेत केली विचारपूस

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्‍याचे माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे नाशिकहून मुंबईतील रिलायन्‍स समूहाच्‍या रुग्‍णालयात हलविण्‍यात आले आहे. दरम्‍यान, हे वृत्त कळताच उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्‍णालयात धाव घेत डॉ. गावित यांची भेट घेउन त्‍यांच्‍या प्रकृतीची विचारपूस केली.

डॉ. विजयकुमार गावित यांना हृदयविकारामुळे काही आठवड्यांपूर्वी नाशिक येथील किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले होते. तेथे त्‍यांच्‍यावर बायपास सर्जरी करण्‍यात आली होती. यानंतर त्‍यांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, डॉ. गावित यांना पुन्‍हा अस्‍वस्‍थ वाटू लागले असून, त्‍यांना तातडीने मुंबई येथील रिलायन्स समूहाच्या रुग्णालयात हलवणे भाग पडले आहे.

शिवसेनेचे मुख्‍य नेते तथा उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्‍यांनी तत्‍काळ बुधवारी (दि.४) रुग्‍णालयात धाव घेत डॉ. गावित यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांनी डॉ. गावित यांच्‍या उपचार व्‍यवस्‍थेची माहिती घेत उपचार करणार्‍या डॉक्‍टरांशी देखील चर्चा केली. तसेच त्‍यांना काही सूचना देखील केल्‍या. दरम्‍यान, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रति सद्भावना आणि सदिच्छा व्यक्त केल्याबद्दल डॉ. कुमुदिनी विजयकुमार गावित यांनी कुटुंबातर्फे त्‍यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button