नंदुरबार जिल्हा

गर्भवतीसह बाळाचे प्राण वाचविणार्‍या देवदुताला ‘उबाठा’चा सलाम; दवाखान्‍यात जावून केला डॉ. मंगेश बर्डे यांचा सत्‍कार

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : भर उन्हात, रस्त्याच्या कडेला प्रसूतीकळांनी व्याकुळ झालेल्या गर्भवतीसाठी देवदूत ठरलेल्या शहादा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश बर्डे  यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. पक्षाचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी ग्रामीण रुग्‍णायलात जावून डॉ. बर्डे यांच्‍यासह त्‍या गर्भवतीवर उपचार करून तिच्‍या बाळाला जन्‍म देण्‍यात सहकार्य करणार्‍या त्‍यांच्‍या सहकार्‍यांच्‍या कार्याला सलाम केला.
सोमवारी (दि.२) शहादा-डोंगरगाव रस्त्यावरील भाव तात्या पेट्रोल पंपाजवळ एक गर्भवती महिला आणि तिचे नातेवाईक भर उन्हात हतबल होऊन उभे होते. त्या मातेची प्रकृती अत्यंत गंभीर होती. याच दरम्यान तेथून जाणारे डॉ. मंगेश बर्डे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला आपल्‍या खासगी गाडीतून तातडीने रुग्‍णालयात आणले. तेथे येताच महिलेवर तातडीचे उपचार करण्‍यात आल्‍याने तिची सुखरूप प्रसुती झाली होती. ​या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी ​डॉ. हिमानी खर्डे, परिचारिका लिलाबाई शिंदे, परिचारक ​हर्षित पटेल, सफाई कामगार ​रवींद्र पानपाटील व इतरांनी डॉ. बर्डे यांना सहकार्य केले होते.
​डॉ. बर्डे आणि त्यांच्या टीमने बजावलेल्या या मानवतावादी कर्तव्याची दखल घेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन सर्वांचा जाहीर सत्कार केला. यावेळी चौधरी यांनी रुग्णालयाची पाहणी करून येथील अडचणी दूर करण्‍यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन चौधरी यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा उपसंघटक मधुकर मिस्त्री, शहरप्रमुख सागर चौधरी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, गणेश चित्रकथे, सुरेश मोरे, दिलीप पाटील, उत्तम पाटील, भगवान अलकारी आदी उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button