नंदुरबार जिल्हा

शहाद्यात ‘सब खुश’ महाशिबिर; शासकीय योजनांच्‍या माहितीसह लाभार्थ्यांना साहित्‍य वाटप, प्रमाणपत्र, पारितोषिकांचीही लयलूट

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्‍यिच्‍या उद्देशाने शहादा येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर तसेच शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा अत्‍यंत उत्‍साहात संपन्न झाला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार आणि तालुका वकील संघ शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर तसेच शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित करण्‍यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायाधीश किशोर सी. संत व न्‍या. वाय. जी. खोबगडे, यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबारचे प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश तथा जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्‍यक्ष न्‍या. किशोर आर. पेठकर हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची उपस्‍थिती होती.
या महाशिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान गरजू लाभार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले तसेच घरकुल लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या महामेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती घेत लाभ घेतला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button