नंदुरबार जिल्हा

सगळे दिवस महिलांचेच, त्‍यांना नेहमीच सन्‍मान द्यायला हवा : डॉ. हिना गावित; कोळदा ग्रा.पं.तर्फे महिलांच्‍या कौतुकाचा सोहळा उत्‍साहात

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : वर्षातील सगळ्‍याच दिवसांवर महिलांची छाप असते. सगळे दिवस महिलांचेच असतात. त्‍यामुळे केवळ जागतिक महिला दिन या एकाच दिवशी त्‍यांचा सत्‍कार न करता दररोज त्‍यांचा सन्‍मान करायला हवा, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार तालुक्‍यातील कोळदा येथे केले.
नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संसद रत्न, माजी खासदार डॉक्टर हिना गावित या उपस्थित होत्या.
यावेळी त्यांच्या हस्ते गावातील महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. पुढाकार घेऊन महिलांच्‍या सन्‍मानाचा कार्यक्रम आयोजित केल्‍याबद्दल डॉ. गावित यांनी कोळदा ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कौतुक केले. तसेच महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व असल्याचे त्‍या म्‍हणाल्‍या.
कार्यक्रमाला कोळदा गावच्या प्रथम नागरिक व लोकनियुक्त सरपंच मोहिनी वळवी, उपसरपंच गायत्री पटेल, सामाजिक कार्यकर्ते अविनाश माळी, ग्रामविकास अधिकारी देवरे तसेच गावातील नागरिक व समस्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा गौरव करण्यात आल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button