नंदुरबार जिल्हा

शहाद्यात ग्रामीण उत्पादने, संस्कृतीचा जागर; नगराध्‍यक्ष अभिजित पाटील म्‍हणाले, ‘सरस’मुळे महिला बचत गटांची ‘उमेद’ नक्‍कीच वाढेल

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील महिलांमध्ये नेतृत्व गुण आहेत. विक्री कौशल्यही आहे. महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मुख्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सहकार्य केले तर त्यांना अधिक चालना मिळून हे महिला स्‍वयंसहायता समूह अधिक प्रबळ होतील, असा विश्‍वास शहादाचे लोकनियुक्‍त नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांनी सोमवारी व्‍यक्‍त केला. यावेळी त्‍यांनी तीन दिवसीय या सरस महोत्सवाला भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे आवाहनही शहादा शहरवासियांना केले.
शहादा येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या जवळील पंचायत समितीच्‍या पटांगणात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नंदुरबारतर्फे आयोजित जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन ‘उमेद’ अभियानाच्या वतीने आयोजित ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे ‘जिल्हास्तरीय सरस व विक्री प्रदर्शन – महोत्सवाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते  झाले. त्यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक चंद्रकांत पवार, शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पोतदार, सहायक गट विकास अधिकारी विकास राठोड, इंजिनीयर हरिश्चंद भोई, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर, कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत चावरे उपस्थित होते.
सरस प्रदर्शनात शहादा तालुक्यातील एकूण १३ प्रभागातील व अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नंदुरबार व नवापुर तालुक्यातील उमेदचे ६० पेक्षा अधिक महिला स्वयं सहायता समूहाचे स्टॉल सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ग्रामीण भागातील उपस्थित महिला स्वयं सहायता समूहातील महिलांना संबोधित करताना उमेद अभियानाचा माध्यमातून सुरु असलेली महिला स्वयंसहायता गटाची चळवळ अधिक व्यापक झाल्‍याचे सांगितले. महिला बचत गटाचा माध्यमातून स्वावलंबी बनत असून, लखपती दीदी देखील होत आहेत. तसेच बँक कर्ज, समुदाय गुंतवणूक निधी या माध्यमातून देखील कर्ज घेऊन विविध व्यवसाय करीत असल्याची माहितीही त्‍यांनी दिली.
याप्रसंगी गटातील महिला प्रेरिका कविता अशोक भामरे, गणोर यांनी देखील अभियानाच्या  माध्यमातून महिलांचे व कुटुंबाचे जीवनमान उंचावत असल्‍याबाबत प्रातीनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक राजेश देवकर यांनी तर आभार तालुका अभियान व्यवस्थापक ईश्वर जगदाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button