डॉ. विजयकुमार गावित यांच्या आरोग्यासाठी ‘शनि’ला साकडे; शनिमांडळस्थित मंदिरात महापूजा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत असलेले राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या उत्तम आरोग्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र शनि महाराज मंदिर, शनिमांडळ येथे विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
ही महापूजा माजी खासदार व संसदरत्न डॉ. हिना गावित यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी डॉ. हिना गावित यांच्यासह सर्वांनीच डॉ. गावित यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्यासाठी शनिचरणी साकडे घातले. या धार्मिक विधीमध्ये डॉ. गावित यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
यावेळी शनी महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील, हिम्मत पाटील, महेंद्र पाटील, भटू धनगर, महेंद्र राजपूत, चिंधू धनगर, प्रकाश भिल, विवेक पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पूजेच्या माध्यमातून डॉ. विजयकुमार गावित यांच्या आरोग्य लाभासाठी सर्वांनी एकत्रित प्रार्थना केली.



