नंदुरबार जिल्हा

शहादा ग्रामीण रुग्णालय ‘सदैव आपकी सेवा में तत्‍पर’ : उष्‍माघाताच्‍या रुग्‍णांसाठी तयार केला विशेष कक्ष

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहर व तालुक्‍यातील रुग्‍णांना सेवा देण्‍यासाठी सदैव तत्‍पर अशी ओळख निर्माण करणार्‍या शहादा ग्रामीण आता वाढत्‍या उन्‍हामुळे निर्माण होणार्‍या परिस्‍थितीचा सामना करण्‍याची तयारी करून ठेवली आहे. वाढत्‍या उन्‍हामुळे उष्‍माघाताचा (हिटस्‍ट्रोक) रुग्‍ण दाखल झाल्‍यास त्‍यांना योग्‍य व तत्‍पर उपचार करता यावेत, यासाठी या रुग्‍णालयात विशेष कक्ष सुसज्‍ज करून ठेवण्‍यात आला आहे. या कक्षामुळे उष्माघाताच्या रुग्णांना तत्काळ आणि प्रभावी उपचार मिळणार आहेत.
शहादा ग्रामीण रुग्णालयात तयार करण्‍यात आलेल्‍या या विशेष कक्षात उष्माघाताच्‍या रुग्‍णांसाठी ५ स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आली असून, हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित (एसी) आहे. त्यामुळे उष्माघात झालेल्या रुग्णांना त्वरित थंड वातावरणात उपचार देणे शक्य होणार आहे.
या कक्षात उष्‍माघाताच्‍या रुग्‍णांवर उपचारासाठी आवश्यक ती सर्व औषधे, सलाईन आणि इतर वैद्यकीय साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आले आहे. तसेच रुग्णांची योग्य काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित परिचारिका व कर्मचारी तैनात करण्यात आले असून, ते २४ तास सेवेसाठी सज्ज आहेत. वेळेवर उपचार मिळण्‍याची व्‍यवस्‍था आणि योग्य सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शहादा परिसरातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.

उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष तयारी करण्यात आली आहे. तरीही या ठिकाणी रुग्‍णांना यावेच लागू नये, अशी आमची इच्‍छा आहे. मात्र, त्‍यासाठी नागरिकांनी उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे. तरीही उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात दाखल व्हावे.
‍- डॉ. मंगेश बर्डे (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्‍णालय, शहादा)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button