नंदुरबार जिल्हा

शहाद्यातील लोकअदालत ठरली फायद्याची, भांडणे मिटली कायमची; ७४ प्रकरणे सामंजस्‍याने निकाली, ३.७९ कोटींची तडजोड

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा येथे पार पडलेली राष्‍ट्रीय लोकअदालत अनेक पक्षकारांना जलद आणि सुलभ न्‍याय मिळवून देणारी ठरली. या लोकअदालतीत ३ कोटी ७९ लाख ५ हजार २६ रुपये इतक्‍या रकमेची तडजोड होऊन ७४ प्रकरणे सांमजस्‍याने निकाली काढण्‍यात आली.
दिल्‍लीतील राष्‍ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्‍या २०२६ मधील नियोजनानुसार आणि महाराष्‍ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व नंदुरबार जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण यांच्‍या निर्देशानुसार शहादा तालुका विधी सेवा समितीच्‍या वतीने शहादा येथे लोकअदालतीचे आयोजन करण्‍यात आले होते. जिल्‍हा न्‍यायाधीश योगेश अ. राणे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्‍या या लोकअदालतीत न्‍या. ए.ए. यादव, यू.एन. पाटील, एम.सी नेपते, के.जे. पटेल, ए.डी. गोरे तसेच शहादा न्‍यायालयातील विविज्ञ ॲड. एस.एस. शाह, डी.एम. राऊळ, एच.वाय. जगदेव, शहादा वकील संघाचे अध्‍यक्ष, सचिव तसेच इतर सदस्‍य उपस्‍थित होते.
या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी स्‍वरूपातील तसेच दाखलपूर्व प्रलंबित प्रकरणांचा समावेश करण्‍यात आला होता. यात महावितरण वीज बिल, दूरध्‍वनी बिल, ग्रामपंचायतींचे पाणीपट्टी व मालमत्ता कर, वाहतुकीचे गुन्‍हे, बँकांची थकित कर्ज प्रकरणे, मोटार अपघात दावे आदींचा समावेश होता.
सहअधीक्षक आर.जी. दळवी, लेखापाल पवन पी. महाजन, संगणक तज्‍ज्ञ आर.एम. भोगले, कनिष्‍ठ लिपिक योगेश चौधरी, व्‍ही.बी. मालेकर, व्‍ही.एस. परळकर, शुभम तलवार, राकेश तिरमल, ए.डी. भामरे, ए.डी. कोळी, न्‍यायालयीन कर्मचारी गणेश कुलकर्णी आदींनी ही लोकअदालत यशस्‍वी करण्‍यासाठी प्रयत्‍न केले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button