नंदुरबार जिल्हा

जगा अन्‌ जगू द्या : पक्ष्यांसाठी ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर पाण्याच्या भांड्यांचे वाटप; शहाद्यात इन्कलाब फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाण्याची टंचाई भासत असताना शहादा येथे इन्कलाब फाउंडेशनने समाजाभिमुख आणि पर्यावरणपूरक असा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी लागणारे साहित्य ‘न नफा – न तोटा’ या तत्त्वावर केवळ ३० रुपयांत उपलब्ध करून देत फाउंडेशन गेल्या चार वर्षांपासून सातत्याने कार्य करत आहे.
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाला विशेष गती देत शहादा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी पुढाकार घेत पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी खरेदी केली आणि पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर इन्कलाब फाउंडेशनने सुरू केलेला हा उपक्रम केवळ सेवा नसून सामाजिक जाणीवेचा संदेश देणारा ठरत आहे. “प्रत्येक घरासमोर एक पाण्याचे भांडे ठेवावे” हा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी इन्कलाब फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन मेहनत घेत आहेत. त्यांच्या समन्वयातूनच हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून अखंड सुरू असून, दरवर्षी अधिकाधिक नागरिक या मोहिमेत सहभागी होत आहेत. हा उपक्रम केवळ पक्ष्यांना जीवनदान देणारा नसून, “जगा आणि जगू द्या” हा संदेश देणारा आदर्श ठरत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button