नंदुरबार जिल्हा

माजी मंत्री आ. डॉ. गावितांमुळे भागणार २३ गावच्‍या ग्रामस्‍थांची तहान; संभाव्‍य पाणीटंचाईवर प्रभावी उपाय, डॉ. हिना गावितांच्‍या हस्‍ते १० गावांना टँकरचे वितरण

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांना ऐन उन्‍हाळ्‍यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या विशेष प्रयत्नातून नंदुरबार तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींना पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १० ग्रामपंचायतींना संसद रत्न माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण शनिवारी (दि. २८) करण्यात आले.
या प्रसंगी आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी व्हिडिओ कॉलद्वारे टँकरची पाहणी केली तसेच ग्रामस्थांना शुभेच्छाही दिल्या. ऐन उन्‍हाळ्‍यात पाणी टंचाई निर्माण होऊन नंदुरबार तालुक्‍यातील ग्रामस्‍थांना त्‍याचा सामना करावा लागू नये, यासाठी आपण प्रयत्‍नशील राहून शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा करीत राहू, असे आश्‍वासन यावेळी माजी खा. हिना गावित यांनी याप्रसंगी दिले.
दरम्‍यान, शनिवारी त्‍यांच्‍या हस्‍ते नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील बलवंड, होळतर्फे रनाळे, वैंदाने, आसाने, मांजरे, रजाळे, खोंडामळी, कोळदा व शनिमांडळ या गावांना पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जि.प. सदस्य प्रवीण पाटील, सागर तांबोळी, वैंदाने उपसरपंच मनोज गिरासे, होळ सरपंच व्यंकट पाटील, आसाने सरपंच शरद पाटील, न्याहली उपसरपंच ए.बी. पाटील, घोटाने सरपंच सचिन धनगर, बलवंड सरपंच संजय पाटील, मांजरे उपसरपंच दगा कोळी, कंढरे सरपंच लोटन पाटील आदी उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button