नंदुरबार जिल्हा

चैत्र पौर्णिमेनिमित्त करणखेडात उसळला भाविकांचा सागर; चंडिका माता मंदिरात जावळ काढण्‍यासह नवस फेडण्यासाठी अलोट गर्दी

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील करणखेडा येथील जागृत देवस्थान असलेल्या आई चंडिका माता मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. नवस फेडण्यासह लहान मुलांचे जावळ काढण्यासाठी खान्देशासह शेजारील मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून हजारो भाविक दाखल झाले होते. दिवसभर चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
​​करणखेडा येथील चंडिका मातेचे मंदिर अतिप्राचीन असून, हे सूर्यवंशी कुळातील नागरिकांचे श्रद्धास्थान तसेच आराध्य दैवत असून कुलदेवता आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे विशेष उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही परंपरेनुसार लहान बालकांचे जावळ काढणे आणि नवसपूर्तीचे विधी मोठ्या उत्साहात पार पडले. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता.
​​यावर्षी उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून ‘आई चंडिका माता देवस्थान ट्रस्ट’ला अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ही आनंदाची बातमी बुधवारी जमलेल्या भाविकांना ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. या प्रमाणपत्राच्या जोरावर आता मंदिराचा भव्य जिर्णोद्धार करण्याचा मानस ट्रस्टच्या सदस्यांनी व्यक्त केला.
नव्‍या कार्यकारिणीची घोषणा
​​यावेळी देवस्थान ट्रस्टच्या नूतन कार्यकारिणीची देखील घोषणा करण्यात आली. निवड झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे अध्यक्ष- हेमंत सुरेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष – ज्ञानेश्वर भिका चौधरी, सचिव- सचिन अशोक चौधरी, सहसचिव- रवींद्र भाईदास पाटील, खजिनदार- दिलीप चिमणराव सूर्यवंशी, सहखजिनदार- सागर मधुकर चौधरी, तर सदस्य म्‍हणून हेमचंद्र मोतीराम चौधरी, दिलीप शंकर चौधरी, अरुण तुमडू चौधरी, भाऊसाहेब देविदास चौधरी, दिलीप पितांबर चौधरी, पांडूरंग वामन सुर्यवंशी, संजय मक्कन चौधरी, हेमराज ओंकार चौधरी, संजय मगन चौधरी, पवन संजय चौधरी, संदिप शिवदास चौधरी, भिमसिंग नथेसिंग गिरासे, दिलीप हंबरसिंग गिरासे, राजेंद्र भाईदास पाटील, लोटनसिंग रणेसिंग गिरासे, श्रीकृष्ण भबुता पाटील, लतेश सुरेश चौधरी, देवाजी परशराम चौधरी, श्रीधर रमण चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button