नंदुरबार जिल्हा

‘झिंगाट’ दुचाकीस्‍वार गाडीसह थेट आ. पाडवींच्‍या वाहनाला भिडला; दोन्‍ही वाहनांचे नुकसान; सुदैवाने आ. पाडवी बचावले

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : मद्यधुंद अवस्‍थेत वेगाने व राँगसाईड दुचाकी पळवणारा झिंगाट दुचाकीस्‍वार वाहनासह थेट आ. राजेश पाडवी यांच्‍या वाहनावर जावून आदळल्‍याची घटना तळोदा- अक्‍कलकुवा रस्‍त्‍यावर डी.बी. हट्टीजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्‍वार किरकोळ जखमी झाला. तर दैव बलवत्तर असल्‍याने आ. पाडवी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आ. राजेश पाडवी हे आपली कामे आटोपून सोमवालकडे परतत येत होते. यावेळी आ. पाडवी हे आपल्‍या एमएच ०४ एन ११३२ या वाहनात बसले होते. याचवेळी एक युवक त्‍याच्‍या दुचाकीवरून (वायजी ०५ एसडी १७८७) आश्रावाकडून येत होता. हा दुचाकीस्‍वार मद्यधुंद अवस्‍थेत राँगसाईड त्‍याचे वाहन चालवत होता. डी.बी. हट्टीजवळ या दुचाकीस्‍वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो सरळ आ. पाडवी बसलेले असलेल्‍या वाहनावर जावून आदळला. विशेष म्‍हणजे आ. पाडवी यांच्‍या वाहनाचे चालक राजू गाडे यांनी जोराने हॉर्न वाजवून दुचाकीस्‍वाराला जागृत करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, तरीही तो योग्‍य पद्धतीने वाहन चालवित नव्‍हता.
दरम्‍यान, ही दुचाकी आ. पाडवी यांच्‍या वाहनावर आदळल्‍याने झालेल्‍या या अपघतातात दोन्‍ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. यात दुचाकीस्‍वार किरकोळ जखमी झाला. तर दैव बलवत्तर असल्‍याने आ. पाडवी यांच्‍यासह त्‍यांच्‍या वाहनातील अन्‍य कुणालाही दुखापत झाली नाही.
आ. पाडवी यांच्‍या वाहनाला अपघात झाल्‍याचे कळताच जितेंद्र सूर्यवंशी, गौरव वाणी, जगदिश परदेशी, गोविंद पाडवी, योगेश गुरव, बागले आदींसह परिसरातील कार्यकर्‍त्यांनी त्‍यांची चौकशी करण्‍यासाठी गर्दी केली होती. नंतर आ. पाडवी यांचे वाहनचालक राजू गाडे यांच्‍या तक्रारीवरून संबंधित दुचाकीस्‍वाराच्‍या विरोधात तळोदा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. पुढील तपास हवालदार गौतम बोराडे करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button