शहाद्यात शिवसेनेने जपली सामाजिक बांधिलकी; जिल्हाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना टिफिन वाटप

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख अॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ७) शहादा तालुका कार्यालय येथे गरजू पुरुष व महिलांना जेवणाच्या टिफिनचे वाटप करण्यात आले. समाजाभिमुख उपक्रमातून शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपल्याचे यावेळी दिसून आले.
हा उपक्रम शिवसेना तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. शहादा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे, नंदुरबार जिल्हा युवा सेना उपप्रमुख राजरत्न बिरारे, शिवसेना ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पेंढारकर, जयेश निकम, गोपाल कोळी, लक्ष्मण पवार, कौस्तुभ मोरे, जगदीश ठाकरे, अशोक वसावे, कल्पेश डांगळे, विजय गायकवाड, आप्पा नगराळे, नंदू चव्हाण, यतीश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत पपई, केळी, मिरची तोडणी तसेच इतर मजुरीच्या कामांसाठी दररोज ये-जा करणाऱ्या कामगारांना तीन ताली जेवणाचे टिफिन वाटप करण्यात आले. गरजू मजुरांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला. शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत असून, सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.



