नंदुरबार जिल्हा

शहाद्यात सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन नंदुरबार जिल्ह्याचा भव्य उद्घाटन सोहळा शहादा येथील मीरा प्रताप लॉन्स येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. मनोज कुमार डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी उपाध्यक्ष निलेश निकम, सचिव संजयजी यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून मोहन शेवाळे (माजी जि.प. सदस्य), सुनील भाऊ गायकवाड (सामाजिक कार्यकर्ता), ॲड. अमोल गुलाले, किरसिंग दादा वसावे, डॉ. राजेंद्र पेंढारकर, ॲड. मनीषा बिरारी, डॉ. रवींद्र गुराले, डॉ. मणिलाल शेल्टे, योगिता जोहरे, मंगेश दादा सुळे, रविंद्रजी बूनकर, राजू प्रधान, आशाताई माळी, जगन ठाकरे, देवीसिंग पावरा आदी उपस्थित होते.
फाउंडेशन महाराष्ट्रभर सुमारे ५ हजार शाखांद्वारे कार्यरत असून आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मितीसाठी गावपातळीवर काम करत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही सुमारे २ हजार कार्यकर्त्यांची टीम विविध स्तरांवर कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहादा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, तळोदा अध्यक्ष अविनाश बागुल, अक्कलकुवा अध्यक्ष वसावे, धडगाव अध्यक्ष भिका ब्राह्मणे, नंदुरबार तालुका अध्यक्ष निर्मला चौधरी, रमेश बच्छाव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button