समाजाला म. फुले यांच्या विचारांची गरज : रवींद्र बागुल; अनरदमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील अनरद गावात समाज सुधारक, शिक्षणप्रेमी आणि स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेसाठी त्यांनी केलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी माजी सरपंच राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच रवींद्र गिरासे, अनरद गावाचे पोलीस पाटील दिनेश पाटील, पाटील समाजाचे चेअरमन सुनील पाटील, सतीश पाटील, नंदशेखर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भरत पाटील, पुंडलिक ठाकरे, मच्छिंद्र भील, मनोज गिरासे, कैलास माळी यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला तसेच त्यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजात समानता व बंधुता निर्माण करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमामुळे गावात सामाजिक एकात्मता आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.



