नंदुरबार जिल्हा

ब्रेकिंग न्यूज : ‘तुम्‍ही भांडू नका, मीच गेट काढून घेतो’ म्‍हणत शहाद्यात घरमालकानेच काढला अतिक्रमण वादावर तोडगा; स्वतःहून काढून घेतले गेट

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील वार्ड क्रमांक पाचमध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर समाधानकारक पडदा पडला. काही दिवसांपूर्वी नंदुरबार भाजप जिल्हा उपाध्यक्षांनी शहादा नगरपालिकेकडे अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन सादर करत या भागातील रस्ता बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आज (दि. १५) संबंधित घरमालकाने स्वतःहून आपले गेट काढून घेतल्याने प्रश्न सुटला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक पाचमध्ये एका घरासमोर लावलेल्या गेटमुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार होती. याबाबत राजकीय स्तरावरही हालचाली सुरू झाल्या होत्या. नगरपालिकेकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, या अनुषंगाने वाद वाढू नये आणि गावातील शांतता अबाधित राहावी, या उद्देशाने संबंधित घरमालकाने पुढाकार घेत स्वतःहून गेट काढण्याचा निर्णय घेतला. “ही जागा अतिक्रमण नसतानाही गावातील शांततेसाठी आम्ही स्वतः गेट काढले आहे, अशी प्रतिक्रिया घरमालकाने दिली.
गावात अतिक्रमणांवर कारवाई करताना कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. अनावश्यक तणाव टाळण्यासाठी संयमाने निर्णय घ्यावेत,” असे आवहनही यावेळी या घरमालकाने प्रशासनाला केले.
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, संवाद आणि समन्वयातून प्रश्न सोडवण्याचा आदर्श समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर जाहीर शेख उशीर यांनी अहवाल सादर करत संपूर्ण घडामोडींची माहिती दिली आहे. एकूणच, अतिक्रमणाच्या संवेदनशील मुद्द्यावर घरमालकाने दाखवलेल्या समंजस भूमिकेमुळे संभाव्य वाद टळला असून, गावात शांततेचा संदेश गेला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button