नंदुरबार जिल्हा

ट्रकने दुचाकीला उडवले; पती जागीच ठार, गंभीर जखमी पत्नीची मृत्यूची झुंज; अक्कलकुवा – तळोदा रस्त्यावरील भीषण दुर्घटना!

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडके दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू तर मागे बसलेली त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना अक्कलकुवा ते तळोदा रस्त्यावरील मोदलपाडा गावानजीक घडली. या भीषण अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सध्या पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील दिनेश भरत वसावे (३८) हे पत्नी प्रमिलाबाई यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच ३९ आर ७३५६) अक्कलकुवाहून कळवला कडे जात होते. याच दरम्यान मोदलपाडा येथून सुमारे ३०० मीटर अंतरावरील सोताली याहा कृषी केंद्रासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिळकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे वसावे पती-पत्नी रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. यात दिनेश वसावे यांना डोक्याला जबर मार लागल्याने यांचा काही क्षणातच जागीच मृत्यू झाला. तर प्रमिलाबाई दिनेश वसावे यांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्यांच्यावर नंदुरबारच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी प्रचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी प्रदीप वसावे यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात संबंधित ट्रकचालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र खैराद या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button