नंदुरबार जिल्हा

हिंदूंनो, कुटुंबव्यवस्था मजबूत करा, एक व्हा अन्‌ पाल्यांच्या सुरक्षेसाठी सजग रहा!; म्हसावदच्या हिंदू संमेलनात जागरूकतेचा हुंकार!

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) :  बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये कुटुंब व्यवस्था मजबूत करणे आवश्यक असून, पालकांनी आपल्या पाल्यांसोबत सातत्याने संवाद वाढवणे गरजेचे आहे. पाल्यांचे विचार संस्कार आणि सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी हिंदू बांधवांनी सजग राहावे, असे आवाहन देवगिरी प्रांताचे परिवर्तन प्रमुख राजेंद्र गावित यांनी केले.
शहादा तालुक्यातील मसावद येथे संघशताब्दी महोत्सवानिमित्त श्रीराम चौकात भव्य हिंदू संमेलन पार पडले. प्रचंड संख्येने ग्रामस्थ उपस्थित असलेल्या या संमेलनात हिंदू एकतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी भागवत कथाकार हभप खगेंद्र महाराज यांनीही हिंदू समाजाचे संघटन एकता आणि संरक्षण यावर भाष्य करताना सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यावर भर दिला. तसेच हिंदू समाजासमोरील विविध आव्हानांवर भाष्य करताना त्यांनी ही आव्हाने मोडीत काढण्यासाठी एकसंघपणे काम करण्याची गरज प्रतिपादित केली.
राष्ट्रभावना आणि एकतेच्या घोषणांनी संमेलनाच्या काळात परिसर दुधुमून गेला होता. सामूहिक हनुमान चालीसा पठण करून या संमेलनाचा समारोप झाला. समारोप प्रसंगी रोहित पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. तर म्हसावद येथील श्रीकृष्ण सखी महिला मंडळ यांनी सादर केलेल्या भजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button