नंदुरबार जिल्हा

काँग्रेसच्‍या महिलाविरोधी धोरणाविरोधात शिवसेनेची डरकाळी!; शहाद्याच्‍या कन्‍साईमध्‍ये घोषणाबाजीसह केला निषेध

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तालुक्यातील कन्साई गावात शिवसेना (शहादा तालुका) तर्फे ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ संदर्भात काँग्रेस व इंडी आघाडीच्या भूमिकेविरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त करीत, नारीशक्तीला विरोध करणाऱ्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.
नारीशक्ती वंदन अधिनियमामुळे महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र काँग्रेस व इंडी आघाडीने या संदर्भात घेतलेली भूमिका ही गरीब, आदिवासी, मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातीतील माता-भगिनींना संसदेत जाण्यापासून रोखणारी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नारीशक्तीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. “महिलांना हक्क मिळालाच पाहिजे”, “नारीशक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिलांना राजकीय सक्षमीकरण देण्यासाठी अशा कायद्यांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. यामध्ये प्रियंका ठाकरे, रिनाबाई ठाकरे, सुशीलाबाई पवार, कोमलाबाई पाडवी, रेखाबाई ठाकरे, गणाबाई सोनवणे, हिराबाई ठाकरे, उखडीबाई ठाकरे, आहलीबाई वळवी, तुशाबाई वळवी, सुमन रहासे, नियावंती मोरे, ओबिता ठाकरे, रीता ठाकरे आदींचा समावेश होता. तसेच शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, जेष्ठ नेते डॉ. राजेंद्र पेंढारकर, लक्ष्मण पवार, गिना ठाकरे, गुलाब वळवी, रोहिदास वळवी, आत्माराम बर्डे, धनराज जायसवाल, जगदीश ठाकरे, संतोष पवार, जुमा पटले, सुदाम ठाकरे आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या निषेध आंदोलनातून महिलांच्या सक्षमीकरणाबाबत जनजागृती करण्यासोबतच नारीशक्तीच्या हक्कांसाठी एकजूट दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button