नंदुरबार जिल्हा

शहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी परिसरातील शिवशक्ती कलर पेंट या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच शहादा नगरपालिका अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकान मालक गौरव संजय पाटील राहणार (रा. गुजर गल्ली, शहादा) हे दुपारच्‍या वेळी दुकान बंद करून घरी गेल्‍यानंतर अवघ्‍या दहा ते १५ मिनिटांतच दुकानात आग लागली. आगीच्‍या ज्‍वाळा दिसताच परिसरातील रहिवाशी व दुकानदारांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्‍यांनी तातडीने घटनास्‍थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दुकानातील काही मालमत्तेचे नुकसान झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. घटनेदरम्यान परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, अग्निशमन कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धाडस आणि तत्परतेचे सर्वांनी कौतुक केले. या घटनेत सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे विद्युत सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button