नंदुरबार जिल्हा

महाराष्ट्र दिनी नंदुरबारच्या सहा पोलीस अधिकारी, अंमलदारांचा गौरव; पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते झाला सन्मान

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र पोलीस दलात विविध प्रकारच्या प्रवर्गात उत्तम कामगिरी करून उल्लेखनीय व प्रशासनीय सेवा दिल्याबद्दल नंदुरबार पोलीस दलातील सहा पोलीस अधिकारी व अंमलदारांचा शुक्रवारी, महाराष्ट्र दिनी गौरव करण्यात आला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रचास्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शुक्रवारी महाराष्ट्र दिनाचा मुख्य कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदान, नंदुरबार येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर मुश्रीफ यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीचे पोलीस निरीक्षक अर्जुन अब्बास पटले, नियंत्रण कक्षातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भगवान बापूराव धात्रक, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, सारंगखेडाचे हेड कॉन्स्टेबल सुपडू पंडित राठोड, धडगाव पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल संजय दौलत माळी आणि पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल सुभाष बापू तमखाने या सहा जणांचा महासंचालकांचे बोधचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी आशा गांगुर्डे, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button