नंदुरबार जिल्हा

शहादा – असलोद रसत्‍यावर भीषण अपघात; ह्युंदाई आय १० कारने दुचाकीला उडवले; मंदाणातील एकाचा जागीच मृत्‍यू

शहादा (वृत्तसंस्‍था / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : कारच्‍या धडकेत ५५ वर्षीय दुचाकीस्‍वाराचा जागीच मृत्‍यू झाल्‍याची दुर्दैवी घटना शहादा ते असलोद रस्‍त्‍यावरील लोहारा फाट्यावर घडली. नितीन वसंत पाटील (रा. मंदाणा, ता. शहादा, जि. नंदुरबार) असे या भीषण अपघातात प्राण गमावलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नितीन पाटील हे काही कामानिमित्त आपल्‍या दुचाकीवरून शहादा ते असलोद रस्‍त्‍याने निघाले होते. ते लोहारा फाटा येथे पोहाचले असता समोरून वेगात आलेल्‍या ह्युंदाई आय-१० कारच्‍या चालकाने हयगयीने वाहन चालवत नितीन पाटील यांच्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, त्‍यामुळे पाटील रस्‍त्‍यावर फेकले गेले आणि त्‍यांना पायाला व डोक्‍याला जबर जखमा झाल्‍या. कारचालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्‍याने कार पाटील यांच्‍या अंगावरून नेले. यामुळे पाटील गंभीर जखमी झाले आणि काही क्षणांतच त्‍यांची प्राणज्‍योत मालवली.
रविवारी सकाळी १०.३० वाजेच्‍या सुमारास झालेल्‍या या अपघातात दुचाकी आणि कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्‍यान, या प्रकरणी मंदाणा (ता. शहदा) येथीलच रहिवाशी असलेला कारचालक विवेक संतोष पाटील याच्‍याविरोधात शहादा पोलीस ठाण्‍यात भारतीय न्‍याय संहितेच्‍या विविध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाघ या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button