नंदुरबार जिल्हा

गोवंशाच्‍या मारेकर्‍यांनो खबरदार, आता आलाय ‘गोरक्षक सेल’; नंदुरबार जिल्‍ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री अन्‌ कत्तल रोखणार्‍या पथकाचे नेतृत्त्‍व पीएसआय भूनेश मराठेंकडे

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यात गोवंशांची अवैध वाहतूक, विक्री आणि कत्तल करणार्‍यांसाठी धडकी भरवणारी बातमी नंदुरबार जिल्‍हा पोलीस दलाने समोर आणली आहे. असे निघृण कृत्‍य करणार्‍यांना रोखण्‍यासाठी पोलिसांनी विशेष ‘गोरक्षक सेल’ची स्‍थापना केली आहे.
गेल्‍या काही दिवसांत जिल्‍ह्यात गोवंशांच्‍या अवैध वाहतुकीची काही प्रकरणे उघडकीस आली होती. त्‍यातच आता नजीकचा काळ सण-उत्‍सवांचा असून, या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरासह जिल्‍हाभरातील कायदा-सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍हा पोलीस दलाने पावले टाकणे सुरू केले आहे. सण-उत्‍सवांच्‍या काळात गोवंशांची अवैध विक्री व कत्तल करून कायदा व सुव्‍यवस्‍थेत अडथळे आणण्‍याचे काम समाजकंटकांकडून केले जाण्‍याची शक्‍यता पाहून पोलीस दलाने आधीच असे प्रकार रोखण्‍यासाठी हा गोरक्षक सेल स्‍थापन केला आहे.
या विशेष पथकात एक पोलीस अधिकारी आणि सहा अंमलदारांचा समावेश असून, या सर्वांची निवड वेगवेगळ्‍या पोलीस स्‍थानकांतून करण्‍यात आली आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्‍यातील उपनिरीक्षक भुनेश मराठे यांच्‍याकडे या पथकाचे नेतृत्त्‍व सोपविण्‍यात आले असून, हेड कॉन्‍स्‍टेबल राकेश मोरे, कॉन्‍स्‍टेबल आनंदा मराठे (दोघेही स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेशन शाखा), कॉन्‍स्‍टेबल ललित गवळी व विशाल मराठे (दोघेही नंदुरबार शहर पोलीस ठाणे) आणि कॉन्‍स्‍टेबल पंकज चव्‍हाण व रोहित राजपूत (दोघेही पोलीस मुख्‍यालय, नंदुरबार) यांचा या पथकात समावेश आहे.
इथे साधा संपर्क…
दरम्‍यान, जिल्‍हाभरात कुठेही गोवंशांची अवैध वाहतूक, विक्री किंवा कत्तल सुरू असल्‍याची माहिती असल्‍यास तातडीने हेल्‍पलाईन क्रमांक ९०२८९५४५१० या क्रमांकावर संपर्क साधावा. सदरील माहिती देणार्‍याची ओळख गोपनीय ठेवण्‍यात येईल, असे आवाहन जिल्‍हा पोलीस दलाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button