नंदुरबार जिल्हा

नंदुरबार तालुक्यातील गावांची तहान भागवताहेत डॉ. विजयकुमार गावित; २३ गावांना डॉ. हिना गावितांच्‍या हस्ते टँकरचे वितरण

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या विशेष प्रयत्नातून नंदुरबार तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींना पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १३ ग्रामपंचायतींना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १५) टँकरचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित सरपंच उपसरपंच व कार्यकर्त्यांना संबोधित केले. पाण्याचे टँकर उपलब्ध झाल्‍यामुळे ग्रामस्‍थांसह गुरे व शेतीची गरज भागेल, असा विश्‍वास यावेळी डॉ. गावित यांनी व्‍यक्‍त केला. बरे वाटू लागल्‍याने रुग्‍णालयातून मुंबईतील घरी परतले असून, येत्या दोन-तीन आठवड्यांनी प्रत्यक्ष नंदुरबारमध्‍ये येणार असल्‍याची माहितीही यावेळी त्‍यांनी दिली.
भेदभाव न करता दिला लाभ : डॉ. हिना गावित
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावांना डॉ. विजयकुमार गावित यांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. विकास काम आणि योजना देताना त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही. पाणीटंचाईचा प्रश्न सोडवतानाही त्यांनी विरोधी पक्षाचे की आपल्या पक्षाचे असे बघितले नाही, असे यावेळी डॉ. हिना गावित यांनी सांगितले. टँकरचा सदुपयोग करून सर्व गरजूंना पाणी पुरवठा केला जावा, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
यावेळी नंदुरबार तालुक्यातील उमर्दै बु., धामडोद, भिलाईपाडा, कंद्रे, शिंदे, पळाशी, खोक्राळे, वळवद, बामडोद, कलमाडी, जुनमोहिदे, कानळदे, घोटाणे या ग्रामपंचायतींना टँकर वितरित करण्यात आले. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील, संस्था अध्यक्ष युवराज पाटील, माजी सरपंच लोटन पाटील यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील बलवंड होळ तर्फे रनाळे, वैंदाने, आसाने, मांजरे, रजाळे, खोंडामळी, कोळदा, शनिमांडळ या गावांना यापूर्वीच पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button