नंदुरबार जिल्हा

रस्‍त्‍यावर पडलेल्‍या झाडामुळे कुकावल-कोठली रस्‍त्‍यावर भीषण अपघात; कारने दुचाकीला उडवले; महिला ठार, दोन जखमी; कारचालकासह कंत्राटदार, मजुरांवर गुन्‍हा

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : रस्‍ते कामासाठी तोडलेले झाड तसेच रस्‍त्‍यावर पडून राहिल्‍याने भीषण अपघाताची दुर्घटना घडल्‍याचा प्रकार सारंगखेडा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत समोर आला आहे. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्‍यू तर एक युवक व एक बालक जखमी झाला आहे. या प्रकरणी दुचाकीला धडक देणार्‍या कारचालकासह संबंधित कामाचे कंत्राट घेतलेला कंत्राटदार व त्‍याच्‍याकडील मजुरांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सारंगखेडा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील शहादा-शिरपूर रस्‍त्‍याचे काम सुरू असून, या कामाचे कंत्राट घेतलेल्‍या कंत्राटदाराने रस्‍त्‍याच्‍या कामासाठी कडेला असलेली काही झाडे तोडली आहेत. नियमानुसार ही झाडे तोडल्‍यानंतर ती बाजूला हटविण्‍याची जबाबदारी असताना ठेकेदार व त्‍याचे मजूर याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्‍त्‍यावर असेच एक झाड रस्‍त्‍यावर पडून आहे. याच दरम्‍यान कुकावल-कोठली रस्‍त्‍यावरून दुचाकीवरून (एमएच १९ सीडी ९०४५) निघालेल्‍या तरुणाला हे झाड रस्‍त्‍यावर पडून असल्‍याने रस्‍त्‍याचा अंदाज आला नाही. त्‍याने या ठिकाणी दुचाकीचा वेग कमी करताच अचानक समोरून भरधाव वेगात आलेल्‍या कारच्‍या (क्र. एमएच ३९ एजे ८७०६) चालकाचाही अंदाज चुकला आणि त्‍याने या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील शाईनबी शेख इक्‍बाल (४३) या महिलेचा जागीच मृत्‍यू झाला. तर मुजाहिद सय्‍यद नूर (२६) व उमर शेख रईस (७ सर्व रा. जि. धुळे) हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी कारचालक सुरेश शरदचंद्र पाटील तसेच वृक्षतोड करणारा ठेकेदार व त्‍याच्‍याकडी मजुरांवर सारंगखेडा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button