नंदुरबार जिल्हा

अक्‍कलकुवाच्‍या ठाणाविहिरजवळ भीषण अपघात; दोन दुचाकी समोरासमोर भिडल्‍या; १७ वर्षीय युवकाचा बळी

अक्‍कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यातील अपघातांची मालिका थांबायला तयार नसून, आता अक्‍कलकुवा तालुक्‍यातील ठाण्‍याविहिर गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्‍या भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागल्‍याची घटना समोर आली आहे. नितीन महेंद्र वसावे (रा. ठाणाविहिर, ता. अक्‍कलकुवा, जि. नंदुरबार) असे या युवकाचे नाव असून, या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्‍वाराच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
नितीन वसावे हा १४ मे रोजी पल्‍सर दुचाकी (क्र. एमएच ३९ एई ०१२०) घेऊन घरून निघाला होता. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर जात नाही तोच समोरून भरधाव वेगात येणार्‍या पॅशन प्रो दुचाकी (क्र. जीजे १९ एसी ३४७४)च्‍या चालकाने महेंद्रच्‍या गाडीला समोरून जोरदार टक्‍कर मारली. गावाजवळील नाल्‍याजवळ दुपारी दीड वाजेच्‍या सुमारास झालेल्‍या या अपघातात दोन्‍ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या धडकेत महेंद्रच्‍या गुडघे, कंबर आणि डोक्‍याला जबर जखमा झाल्‍या. तर दुसर्‍या दुचाकीचा चालक त्‍याला मदत करण्‍याऐवजी घटनास्‍थळावरून फरार झाला. या दुर्घटनेनंतर आसपासचे रहिवासी तसेच गावकर्‍यांनी नितीन वसावे या गंभीर जखमी अवस्‍थेत तातडीने नजीकच्‍या रुग्‍णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍याला मोठ्या रुग्‍णालयात नेण्‍यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्‍याने दम तोडला.
या प्रकरणी नितीनचे वडिल महेंद्र वसावे यांनी अक्‍कलकुवा पोलीस ठाण्‍यात फिर्याद नोंदवली. त्‍यावरून गुन्‍ह्याची नोंद करण्‍यात आली असून, या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार अतुल गावित करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button