नंदुरबार जिल्हा

महागाईविरोधात शिवसेनेचा (उबाठा गट) एल्गार; जनआक्रोश दाखवण्‍यासाठी उद्या (मंगळवारी) शहाद्यात करणार भव्य आंदोलन

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : जीवनावश्‍यक वस्‍तूंच्‍या दिवसागणिक वाढत चाललेल्‍या किमतीमुळे वाढणारा जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक होत मंगळवारी (दि. ९) शहादा येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उपनेते तथा रावेर व नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, दुपारी १२ वाजता हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती, सर्वसामान्‍यांच्‍या वाढत्‍या आर्थिक अडचणी आणि शासनाच्या धोरणांविरोधात या आंदोलनातून आवाज उठविण्यात येणार आहे. महागाईमुळे सामान्य कुटुंबांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आंदोलनाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत तालुक्यातील सर्व शिवसेना शाखाप्रमुख, पदाधिकारी तसेच शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी यांनी जातीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण आप्पा चौधरी आणि जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button