नंदुरबार जिल्हा

नंदुरबारच्‍या ‘उत्‍पादन शुल्‍क’ची जोरदार कामगिरी; ताडीसह अवैध दारू विक्रेत्‍यांवर जिल्‍हाभर धाडसत्र, ११.३७ लाखांचा मुद्देमाल जप्‍त, ९१ जणांवर गुन्‍हा

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : पुणे जिल्‍ह्यात गावठी हातभट्टी दारूच्‍या सेवनाने अनेकांचा बळी गेल्‍यानंतर जागे झालेल्‍या राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने राज्‍यभर अवैध दारू विक्रेत्‍यांवर कारवाईचा फास आवळला आहे. यात नंदुरबारच्‍या राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने जोरदार कामगिरी करीत गेल्‍या १५ दिवसांत जिल्‍हाभर धाडसत्र राबवून तब्‍बल ११ लाखांचा ताडी व अवैध दारूचा साठा जप्‍त केला आहे. या प्रकरणांत ९१ जणांवर गुन्‍हे नोंदविण्‍यात आले आहेत.
राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या अधीक्षक स्‍नेहा सराफ यांच्‍या मार्गदर्शनाखाली २९ मे ते १४ जून या १५ दिवसांत जिल्‍हाभर अवैध दारू आणि ताडी विक्रेत्‍यांवर धाडसत्र राबविण्‍यात आले. या कालावधीत जिल्‍ह्यातील गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रे तसेच ताडी विक्री केंद्रांवर एकाच वेळी धाडी टाकण्‍यात आल्‍या. या कारवाईदरम्‍यान राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या पथकांनी विविध ठिकाणांहून तब्‍बल ३ हजार ६१८ लिटर गावठी हातभट्टी दारू, ११ हजार ३८५ लिटर दारू बनवण्‍याचे रसायन, ५९५ लिटर ताडी आणि गुन्‍ह्या Aसाठी वापरलेल्‍या ५ दुचाकी असा मुद्देमाल जप्‍त केला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ११ लाख ३७ हजार ११५ रुपये आहे. या मोहिमेत एकूण ९१ जणांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात आले.
यांनी केली कारवाई…
राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या भरारी पथकाचे निरीक्षक व्‍ही.ए. चौरे, राजेश सपकाळ, दुय्‍यम निरीक्षक शरद कानडे, अमित गायकवाड, प्रणव मोरे, बेडकीपाडा सीमा तपासणी नाका येथील दुय्‍यम निरीक्षक कुणाल पाटील, खेडदिगर नाका येथील हेमंत घरटे, विकास हरिश्‍चंद्रे आणि पथकांतील इतर सहकार्‍यांनी केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button