गुन्हे वार्ता

धडगाव तालुक्यात रक्तरंजित ‘व्हॅलेन्टाइन डे’ : चारित्र्याच्या संशयावरून बांबूने झोडपून पत्नीचा जीव घेतला!

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘व्हॅलेन्टाइन डे’ म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीवर भरभरून प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पण धडगाव तालुक्यात याच दिवशी एकाने पत्नीचा जीव घेत हा प्रेमाचा दिवस रक्तरंजित केला. चारित्र्याच्या संशयावरून झालेली ही खुनाची घटना रोषमाळचा लहान खर्डीपाडा ता. धडगाव येथे घडली.
ललिता दीपक पावरा (लहान खर्डीपाडा ता. धडगाव) असे मयत महिलेचे तर दीपक माणिक पावरा असे तिचा खून करणाऱ्या तिच्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी दीपक याच्या १४ वर्षीय मुलीनेच त्याच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
दीपक नेहमीच ललिताच्या चारित्र्यावरून संशय घेत तिच्याशी भांडायचा. अनेकदा या कारणावरून भांडण आल्यानंतर दीपक तिला मारहाण देखील करीत असे.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीही ललिता व दीपक यांच्यात जोरदार भांडण झाले. या वादातच दीपकने तिला बांबूने मारहाण सुरू केली. यात बांबूचा वार वर्मी बसल्याने ललिता गंभीर जखमी होऊन जागीच कोसळली. यानंतर काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आता दीपक पावरा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button