गुन्हे वार्ता

सकाळी फोनवरून धमकी मिळाली अन् रात्री शेतातील साहित्य झाले गायब; नंदुरबार तालुक्यातील धक्कादायक प्रकार

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शेतीचा हंगाम सुरू असतानाच सगळीकडेच शेतीतील साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार वाढले असू,असू,असून, अशात नंदुरबार तालुक्यातील भागसरी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे देखील शेतातून शेती साहित्य चोरीला गेले असून, विशेष म्हणजे या चोरीआधी संबंधित शेतकऱ्याला फोनवरून धमकी देण्यात आली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. प्रवीण संभाजी पाटील (रा. खोंडामळी, ता. नंदुरबार) यांच्या शेतात ही चोरी झाली असून, त्यांनी या संदर्भात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. गावातीलच जितेंद्र अशोक पाटील याने आपल्याला सकाळी फोनवरून धमकी दिली. यानंतर त्याच दिवशी रात्री आपली शेतातून शेती साहित्य, शेतीपंपाचे केबल आणि मेन स्विच चोरीला गेले. या साहित्याची किंमत सुमारे १३ हजार ५०० रुपये असून, प्रवीण पाटील यांनी या चोरीसाठी जितेंद्र पाटील यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी जितेंद्र पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button