गुन्हे वार्ता

नंदुरबार तालुक्‍यात भीषण दुर्घटना : बोअरवेलच्‍या पिकअप वाहनाने ११ वर्षीय चिमुकलीला उडवले, जागीच मृत्‍यू

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शेतात जाण्‍यासाठी घरून निघालेल्‍या ११ वर्षीय चिमुकलीला रस्‍त्‍यातच मृत्‍यूने गाठल्‍याची दुर्दैवी घटना नंदुरबार तालुक्‍यातील नांदरखेडा ते पिंप्रीपाडा दरम्‍यानच्‍या रस्‍त्‍यावर घडली. भरधाव बोअरवेल पिकअप वाहनाच्‍या धडकेत या मुलीचा मृत्‍यू झाला. कल्‍याणी विनोद राठोड असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून, या प्रकरणी पिकअप वाहनाचा चालक भवरलाल बालचंद चव्‍हाण याच्‍याविरोधात पोलिसांत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

नंदुरबार तालुक्‍यातील नांदरखेडा येथील विनोद खेमराज राठोड मुलगी कल्‍याणी राठोड (११) ही बहिण अश्‍विनी हिच्‍यासमवेत नांदरखेडा ते पिंप्रीपाडा रस्‍त्‍यावरील शेतात जाण्‍यासाठी घरून निघाली होती. याच दरम्‍यान भरधाव वेगात आलेल्‍या बोअरवेल करणार्‍या पिकअप वाहनाने (क्र. एमएच १८ एम २४७५) कल्‍याणीला जोरदार धडक दिली. या धडकेत कल्‍याणीला जबर मार लागला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने तिला नजीकच्‍या रुग्‍णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्‍टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी विनोद राठोड यांच्‍या तक्रारीवरून भवरलाल चव्‍हाण याच्‍याविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल अशोक बहिरम हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button