गुन्हे वार्ता

शहादातील धक्‍कादायक घटना : लोक होळी मनवण्‍याच्‍या गडबडीत, तिकडे चोरट्यांनी पावणेदोन लाखांची डीजे साऊंड सिस्‍टमच चोरून नेली!

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : सातपुड्याच्‍या पर्वतरांगांमध्‍ये आदिवासी बांधव परंपरांगत होळी साजरी करीत असतानाच शहादा शहरात मात्र याच परिस्‍थितीचा गैरफायदा घेत मोठ्या ऐवजावर डल्‍ला मारला. लोक होळी साजरी करण्‍याच्‍या गडबडीत असतानाच चोरट्यांनी तब्‍बल १ लाख ७८ हजार रुपये किमतीची डीजे साऊंड सिस्‍टम चोरून नेली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १ मार्च रोजी मध्‍यरात्री ११.३० ते २ मार्चला सकाळी ८ वाजेच्‍या दरम्‍यान शहादा येथील येथे एनआरआय कॉलनी डीजे साऊंड सिस्टीमचे गाडीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. वाहन क्र. एमएच ०४ एल ३३१५ वर ठेवलेले १ लाख ७८ हजार रुपये किमतीचे डीजे साऊंड सिस्टीमचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्‍याचे दुर्गेश भानुदास पाटील (रा. ब्राह्मणपुरी, ता. शहादा) यांनी फिर्यादीत म्‍हटले आहे. चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये झायपर झेड -६ पॉवर एएमपीचे (किंमत ८२ हजार रुपये), एनएक्‍स ऑडिओ एमटी – २ हजार पॉवर एएमपी (किंमत ५२ हजार रुपये), डीबीएक्‍स – २६० क्रॉस वर्क (किंमत २२ हजार ५०० रुपये) आणि जेएमएल -४.८ क्रॉस वर्क (किंमत १८ हजार ५०० रुपये) या उपकरणांचा समावेश आहे.
या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्‍या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार घनश्‍यात सूर्यवंशी करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button