गुन्हे वार्ता

सिमकार्ड वापरायला दिले नाही म्‍हणून तरुणावर प्राणघातक हल्‍ला; नंदुरबार शहरातील धक्‍कादायक घटना, दगडासह चाकूनेही केले वार

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : स्‍वत:चे मोबाईल सिमकार्ड वापरायला न दिल्‍याच्‍या रागातून एका व्‍यावसायिक तरुणावर प्राणघातक हल्‍ला करण्‍यात आल्‍याची धक्‍कादायक घटना नंदुरबार शहरात घडली. या घटनेत संबंधित तरूण गंभीर जखमी झाला असून, त्‍याच्‍या चाकूसह दगडांनी वार करण्‍यात आले होते.
नंदुरबारच्‍या उपनगर पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नंदुरबारमधील सिंधी कॉलनी भागात खासगी व्‍यवसाय करणार्‍या यश गणेशलाल रोहेडा (२४, रा. जुनी सिंधी कॉलनी, नंदुरबार) याच्‍याकडे याच परिसरात राहणार्‍या नितेश गुलाबचंद मंदाना याने मोबाईल सिमकार्ड वापरायला देण्‍याची मागणी केली होती. मात्र, त्‍याला यशने नकार दिला. याचा राग मनात धरून नितेशने शनिवारी (दि.७) दुपारी ३.३० वाजेच्‍या सुमारास यशवर हल्‍ला चढवत त्‍याच्‍या डोक्‍यात दगडाने प्रहार केला. यावेळी नितेशकडे चाकूही होता. तो चाकूचे वार करण्‍याची शक्‍यता पाहून यशने तो चाकू हिसकावून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. यात त्‍याच्‍या डाव्‍या हाताच्‍या बोटाला दुखापत झाली.
नंतर रात्री उशीरा यश रोहेडा याच्‍या तक्रारीवरून नितेश मंदाना याच्‍या विरोधात उपनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button