गुन्हे वार्ता

मोलगीत धक्‍कादायक घटना : तरुणाला चौघांनी घेरून केले मारहाण; विळ्‍याने वार करीत डोके फोडून दिली जीवे मारण्‍याची धमकी

अक्‍कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शेतीच्‍या जुन्‍या वादातून आणि शेतीशी संबंधित गोष्‍टी उकरून काढत चार जणांनी एका तरुणाला गाठून लाथाबुक्‍क्‍यांनी तसेच पाठीमागून डोक्‍यात विळ्‍याचे वार करून गंभीर जखमी केल्‍याची धक्‍कादायक घटना मोलगी येथे घडली. या घटनेत जखमी झालेला तरुण वेरीचा खारीपाडा, ता. अक्‍कलकुवा येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बिना राज्‍या वसावे हा होळी पाहून गावातील घरी परतत होता. त्‍याचवेळी मागून आलेल्‍या चौघांनी ४ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजेच्‍या सुमारास मोलगी येथील साकल्‍याशेत किरकोळ धान्‍य विक्रीच्‍या दुकानाजवळ सार्वजनिक ठिकाणी गाठून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू केली. यावेळी संशयित आरोपींपैकी एकाने लोखंडी विळ्‍याच्‍या आकाराच्‍या धार्‍याने मागील बाजूने फिर्यादीच्‍या डोक्‍यात वार केला. यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला. यावेळी संशयित आरोपींनी त्‍याला जीवे मारण्‍याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्‍हटले आहे.
बिना वसावे याने ११ मार्च रोजी संध्‍याकाळी यासंदर्भात दिलेल्‍या फिर्यादीवरून दिव्‍याला कर्मा वसावे, सिंगा कर्मा वसावे, मोन्‍या दिवाला वसावे आणि अनिल सोत्‍या वसावे (सर्व रा. वेरीचा खारीपाडा, ता. अक्‍कलकुवा, जि. नंदुरबार) यांच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल किरण धनगर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button