गुन्हे वार्ता

प्रकाशात भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्‍या धडकेने घेतला ५५ वर्षीय मनोरूग्‍णाचा बळी, शहादामार्गे तळोदाकडे जाणार्‍या रस्‍त्‍यावरील दुर्घटना

प्रकाशा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाच्‍या चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून ५५ वर्षीय मनोरूग्‍णाचा जीव घेतल्‍याची भीषण दुर्घटना प्रकाशा गावात घडली. मगन भामटा मोरे (५५, रा. जुवानी, पोस्‍ट तुळाजा, ता. तळोदा, जि. नंदुरबार) असे या अपघातात ठार झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव असून, या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्‍या विरोधात शहादा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मगन मोरे हा व्‍यक्‍ती मानसिकदृष्‍ट्या कमजोर होता. तो गेल्‍या १० ते १५ दिवसांपासून प्रकाशा गावात फिरायचा. याच दरम्‍यान ११ मार्च रोजी मध्‍यरात्री १२.३० वाजेच्‍या सुमारास प्रकाशा गावातून शहादामार्गे तळोदाकडे जाणार्‍या रस्‍त्‍यावर हॉटेल श्रीकृष्‍णसमोर त्‍याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्‍ये डोक्‍याला गंभीर मार लागून मगनचा जागीच मृत्‍यू झाला. विशेष म्‍हणजे अज्ञात वाहनाचा चालक मगनला मृतावस्‍थेत सोडून तेथून पळून गेला.
या प्रकरणी पोलिस नाईक कैलास तावडे यांच्‍या तक्रारीवरून संबंधित अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्‍ह्याची नोंद करण्‍यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button