गुन्हे वार्ता

सारंगखेडात भीषण दुर्घटना; ट्रॅक्‍टर चालकाचा हयगयीपणा, घरी परतणार्‍या पादचार्‍याला चिरडले, जागीच मृत्‍यू  

सारंगखेडा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : ट्रॅक्‍टरचालकाने निष्‍काळजीपणाने वाहन चालवून घरी परतणार्‍या पादचार्‍याला धडक दिल्‍याची भीषण दुर्घटना शहादा तालुक्‍यातील सारंगखेडा येथे मंगळवारी भरदुपारी एक वाजेच्‍या सुमारस घडली. या घटनेत सदर ३५ वर्षीय पादचारी तरुण जागीच दगावला असून, ट्रॅक्‍टरचालकाच्‍या विरोधात सारंगखेडा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सायबु सजन पगारे (३५, रा. कोकले, ता. साक्री, जि. धुळे) हा तरुण सोमवारी (दि. १७) दुपारी १२.५० वाजेच्‍या सुमारास शहादा-दोंडाईचा रस्‍त्‍याने पायी चालला होता. याचवेळी सारंगखेडा गावातील अमर रसवंतीजवळ रस्‍त्‍यावर मागून आलेल्‍या ट्रॅक्‍टरने (एमएच १८ जीई ६९०२) त्‍याला जोरदार धडक दिली. यात सायबू पगारे रस्‍त्‍यावर फेकला गेला आणि गंभीर जखमी होऊन त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला.
या प्रकरणी सायंकाळी सायबू पगारे यांचे साडू श्रीराम पिरण ठाकरे (रा. दातर्ती, ता. साक्री, जि. धुळे) यांच्‍या तक्रारीवरून ट्रॅक्‍टरचा चालक अरुण सुभाष ठाकरे (रा. छडवेल, ता. साक्री, जि. धुळे) याच्‍यावर हयगयीपणे वाहन चालवून मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल जलाल शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button