ब्रेकिंग न्यूज : नंदुरबारमध्ये आगीचे भीषण तांडव; सोनार खुंट चौकातील थरार, घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य भस्मसात

नंदुरबार /शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरात बुधवारी आगीने तांडव नृत्य केले. शहरातील सोनार खुंट चौक परिसरात सायंकाळी उशीरा एका घराला लागलेल्या भीषण आगीत या घरातील साहित्य जळून खाक झाले.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे भरत सोनार यांच्या घराला ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरूवातीला छोट्या स्वरूपात लागलेल्या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्याने घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य व अन्य वस्तू जळून खाक झाल्या.
घटनेची माहिती मिळताच नंदुरबार नगरपरिषद यांच्या अग्निशामक दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.



