नंदुरबार शहर

नंदुरबारच्‍या स्‍वच्‍छतेला बळकटी : तुंबलेल्‍या गटारी स्‍वच्‍छ करण्‍यासाठी नगर पालिकेला मिळाले अत्याधुनिक ‘सक्शन कम जेटिंग’ मशीन; आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्‍या पाठपुराव्याला यश

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : दरवर्षी पावसाळ्‍यात गटारी तुंबण्‍याच्‍या त्रासाला वैतागलेल्‍या नंदुरबारवासीयांसाठी गुड न्‍यूज आली आहे. शहरातील या समस्‍येवर मात करून स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी ‘स्वच्छ भारत संचालनालया’कडून नंदुरबार नगर पालिकेला अत्याधुनिक ‘सक्शन कम जेटिंग’ मशीन वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुमारे एक कोटी रुपये किमतीच्‍या या मशीनचे लोकार्पण शिवसेना नेते आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) करण्यात आले.
नगर पालिकेला हे अत्याधुनिक मशीन मिळावे यासाठी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वच्छ भारत संचालनालयाकडे प्रयत्न केले होते. आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि. निर्मित ही अत्याधुनिक मशीन गटारे, नाले आणि भूमिगत ड्रेनेज लाईनची सफाई करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या मशीनमध्ये ८ हजार लिटर क्षमतेची दुहेरी टाकी असून, एका भागात सांडपाणी व गाळ सक्शनद्वारे उचलण्याची तर दुसऱ्या भागात उच्च दाबाने पाण्याचा मारा करून ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्याची सुविधा आहे.
या मशीनमुळे शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, गटार सफाई आणि ड्रेनेज देखभाल अधिक वेगाने व प्रभावीपणे करता येणार असून, शहरवासीयांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच पावसाळ्यात गटारे तुंबण्याच्या समस्या कमी करण्यासही या वाहनाचा मोठा फायदा होणार आहे.
लोकार्पण प्रसंगी आरोग्य सभापती प्रीतम धंडोरे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,मुख्याधिकारी राहुल वाघ, नगरसेवक किरण रघुवंशी, कुणाल वसावे, गौरव चौधरी, कमल ठाकूर, विजय माळी, चेतन वळवी, भूषण नेरे, आकाश अहिरे उपस्थित होते.

‘सक्शन कम जेटिंग’ मशीन पालिकेला मिळावे यासाठी स्वच्छ भारत संचालनालयाकडे पाठपुरावा केला होता. शहराच्या स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आहे. शहरवासीयांच्‍या आरोग्य व सुविधांना प्राधान्य देण्याची भूमिकेतून या नव्या वाहनाच्या समावेशामुळे स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळणार आहे.
– आ. चंद्रकांत रघुवंशी

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button