महाराष्ट्र
ताजी बातमी : नंदुरबारचे पालकमंत्री पद आता हसन मुश्रीफ यांच्याकडे

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आता नंदुरबार जिल्ह्याचे पालकत्त्व सोपविण्यात आले आहे. राज्य सरकारच्या वतीने मुश्रीफ यांची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बुधवारी (दि.१८) नियुक्ती जाहीर करण्यात आली.
याआधी क्रीडा व युवक कल्याण तथा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. मात्र, बुधवारी अचानक राज्य सरकारने यात बदल करून या पदावर हसन सकिना मियालाल मुश्रीफ यांची नियुक्ती जाहीर केली. राज्यपालांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या नियुक्तीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.



