गुन्हे वार्ता

मोलगीत गुंडांच्‍या टोळीचा हैदोस : दोघांना भररस्‍त्‍यात अडवून टेकडीवर नेत लुटले, चाकुच्‍या धाकाने दोन मोबाईलसह रोकडही काढून घेतली  

मोलगी (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : मोलगी गावानजीक गुंडांच्‍या टोळीने धुडगूस घातल्‍याची गंभीर घटना बुधवारी घडली. या टोळक्‍याने एका तरुण शेतकर्‍यासह त्‍याच्‍या सहकार्‍याला भर रस्‍त्‍यात अडवून सुनसान टेकडीवर नेत चाकुचा धाक दाखवत लुटले. या प्रकरणी या टोळीतील सहा ते सात जणांव मोलगी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांन दिलेल्‍या माहितीनुसार, प्रवीण रमेश साळुंके (रा. ज्ञानेश्‍वर नगर, देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) हा ३५ वर्षीय तरुण शेतकरी कामानिमित्त अक्‍कलकुवा तालुक्‍यातील मोलगी परिसरात आला होता. बुधवारी सकाळी ९ वाजेच्‍या सुमारास वाहनावरून जात असताना मोलगीपासून ७ ते ८ किलोमीटर अंतरावरील सुनसान रस्‍त्‍यावर त्‍याला व त्‍याच्‍या एका सहकार्‍याला गुंडांच्‍या टोळीने अडवले. यावेळी या टोळीने त्‍याला चाकू व इतर शस्रांचा धाक दाखवून जवळच असलेल्‍या निर्जन टेकडीवर नेले. तेथे त्‍या गुंडांनी चाकूचा धाक दाखवून त्‍यांच्‍याकडून रोख ६ हजार रुपये तसेच अनुक्रमे २८ हजार ५०० रुपये व २३ हजार २०० रुपये असे दोन मोबाईल काढून घेतले. यानंतर गुंडांच्‍या टोळीने घटनास्‍थळावरून पोबारा केला.
नंतर प्रवीण साळुंके याच्‍या तक्रारीवरून अजय, नरेश व त्‍यांचे ४ ते ५ साथीदार (कुणाचेही पूर्ण नाव माहिती नाही) अशा एकूण सहा ते सात जणांवर दरोड्याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक पावरा या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button