गुन्हे वार्ता

अनैतिक संबंधांच्‍या चर्चेतून बदनामी असह्य; तळोद्यातील २५ वर्षीय तरुणाची गळफास लावून घेत आत्‍महत्‍या, महिलेवर गुन्‍हा

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नात्‍यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्‍याची बदनामी एका महिलेने केल्‍याच्‍या तणावातून २५ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून घेत आत्‍महत्‍या केल्‍याची हृदयद्रावक घटना तळोदा येथे घडली. छगन गोण्‍या पावरा असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरुणाचे नाव असून, विशेष म्‍हणजे एक महिला आपली बदनामी करीत असल्‍यानेच आत्‍महत्‍या करीत असल्‍याचा व्‍हिडिओ त्‍याने गळफास लावून घेण्‍याआधी चित्रीत केला होता. आता त्‍याला आत्‍महत्‍येस भाग पाडल्‍याच्‍या तक्रारीवरून एका महिलेवर तळोदा पोलिस ठाण्‍यात एका महिलेवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तळोदा येथील छगन पवार याचे नात्‍यातीलच महिलेशी अनैतिक संबंध असल्‍याची चर्चा गेल्‍या काही दिवसांपासून होती. एवढेच नव्‍हे तर हे दोघे शारीरिक संबंध ठेवून अश्‍लिल वर्तन करीत असल्‍याची चर्चा व्‍हायची. एक महिला ही चर्चा घडवून आणत असून, त्‍यातून आपली बदनामी होत असल्‍यामुळे तो सतत तणावात राहत होता. यातूनच त्‍याचे मानसिक स्‍वास्‍थ्‍य बिघडले आणि यातूनच त्‍याने १५ मार्च रोजी पहाटे चार वाजेच्‍या आधी त्‍याने रेवानगर (ता. तळोदा) शिवारातील स्‍वत:च्‍या शेतातील आंब्‍याच्‍या झाडाला गळफास लावून घेतला. हे कृत्‍य करण्‍यापूर्वी त्‍याने सदरील महिले नाव घेत तिने बदनामी केल्‍यानेच आत्‍महत्‍या करीत असल्‍याचा व्‍हीडिओ मोबाईलमध्‍ये चित्रित करून ठेवला होता.
छगन पवार याचा भाऊ रतन गोण्‍या पवार याने संबंधित महिलेविरोधात तळोदा पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्‍यावरून गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक महेश निकम करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button